Ajit Pawar : “दादा कोल्हापूरच्या हत्तीणीला परत आणा”; तरुणाची भरसभेत मागणी : अजित दादांनी काढली समजूत म्हणाले…

Ajit Pawar : राज्यभरात कोल्हापूर येथील नांदणी मठातील हत्तीणीला गुजरातमधील वनतारा या प्राणी संवर्धन केंद्रात नेण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावरून सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. नांदणीतील ग्रामस्थांनी तर आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त केला आहे.
नांदणीतील गावकऱ्यांनी अंबानी यांच्या जीओ कंपनीचे सीमाकार्ड पोर्ट करून घेतले आहेत. कलाविश्वातूनही या प्रकरणावरून पोस्ट लिहित कलाकारांनी संताप व्यक्त केला जात आहे. अशातच वरंवड येथील उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्या भर सभेत एका तरुणाने हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “दादा ती माधुरी हत्तीण आहे, ना तिला आणा परत वनतारामधून…. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं एक तरुण अजित पवार यांच्याकडे मागणी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या तरुणाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी त्याची समजूत काढली आहे.
नेमकं काय म्हणाला तरुण?
वरवंड येथे अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतील एक तरुण अजित पवार यांचं भाषण सुरू असताना दादा… ती माधुरी हत्तीण आहे ना तिला आणा परत… वनतारामधून… लोकांच्या भावना दुखावल्याहेत…पण तो तरुण नेमकं काय म्हणतोय हे सुरुवातीला अजित पवार यांच्या लक्षात येत नाही.
त्यानंतर तरुण उभं राहून दादा माधुरी हत्तीणीला परत आणा वनतारामधून ती कोल्हापूरची हत्तीण आहे. तिला वनतारामध्ये घेऊन गेले. यावर अजित पवार तरुणाची समजूत काढतं “अरे माधुरी हत्तीण ना त्या माधुरी हत्तीणीच्याबद्दल सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे. आपण संविधान आणि कायद्याने देश चालवतो”, असं उत्तर दिलं. तुला जसा जगण्याचा अधिकार आहे, तसा पक्षांना आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार असल्याचे देखील ते म्हणाले.
हेही वाचा : राज ठाकरेंचा इशारा अन् मनसैनिकांनी टाकली धाड; पनवेलमधील लेडीज बारची मध्यरात्री तोडफोड





