Accident News : राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! पालघरमध्ये २८ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू; ३ वेगवेगळ्या दुर्घटनांत 3 जणांचा बळी
Accident News : राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एका महिला डॉक्टरसह तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे

Accident News : महाराष्ट्रात शुक्रवारी विविध ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. पालघर, भुसावळ आणि अमरावती येथे घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)
पालघर जिल्ह्यातील बोईसर-चिल्हार महामार्गावरील खैरापाडा पुलाजवळ भरधाव ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 28 वर्षीय दंतचिकित्सक डॉ. कृष्णप्रभा यांचा जागीच मृत्यू झाला. त्या खैरापाडा येथील कृष्णानगर परिसरातील रहिवासी होत्या. (Accident News)
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Accident News)
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वरणगाव रोडवरील कपिल वस्ती नगर परिसरातही भीषण अपघात घडला. भरधाव कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन मोटारसायकलवर आदळली. या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकलवरील आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Accident News)
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चांदूरबाजार मार्गावरील पेडी नदी पुलावर विटांनी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळला. ट्रकने सुरक्षा कठडा तोडत थेट नदीपात्रात झेप घेतल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. (Accident News)
स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मदतकार्य राबवले. जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. राज्यातील या सलग अपघातांच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Accident News)





