यंदाच्या निवडणुकीत कोणाला पाडायचे; लक्ष्मण हाकेंनी थेट नाव घेत यादी केली जाहीर

पुणे : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात उभे ठाकलेले ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे इतिहासजमा होतील असे हाके यांनी म्हटले. मनोज जरांगे यांची यादी जाहीर केल्यानंतर आम्ही ओबीसी आघाडीची यादी जाहीर करणार असल्याचे हाके यांनी सांगितले.
लिस्टमधील ‘या’ नेत्यांची नावे केली जाहीर
आमची यादी तयार आहे. फक्त जरांगे पाटलांच्या यादीची वाट पाहत आहोत. या निवडणुकीत रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांना आम्ही पाडणारच आहोत असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
जरांगेना लगावला टोला
या निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं याच्या याद्या तयार झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन 4 नोव्हेंबर नंतर आम्ही यादी जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहीर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहीर करू. जरांगेच्या एमडीएमचं काही खरं नाही. उद्याच आरएमडी देखील म्हणतील, असा टोलादेखील लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेना लगावला आहे.





