Breaking News : महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार.! ठाकरेंना मोठा धक्का बसणार..; संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना

Breaking News । Sanjay Raut – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांमध्ये अंतर्गत नाराजी असून ते लवकरच तृणमूल काँग्रेसच्याधर्तीवर स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी या नाराज खासदारांना खुली ऑफर दिल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे.
दुसरीकडे, या संभाव्य बंडाचा कट हाणून पाडण्यासाठी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
ते म्हणाले, जर खासदार आणि आमदारांचा त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल आणि जर त्यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल, तर शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच उघडे आहेत. भविष्यात त्यांनी असा विचार केल्यास आम्ही त्यांना नक्कीच प्राधान्य देऊ.
रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर होते. यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह ५ खासदारांनी वैयक्तिक कारणांचे दाखले देत प्रत्यक्ष उपस्थिती टाळली.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : खासदारांसोबतच ठाकरेंचे आमदार देखील करणार बंड? आकडा आला समोर
बैठकीला दांडी मारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आला.
ठाकरे गटाचे ५ खासदार बंडखोरी करून लोकसभेत वेगळा गट स्थापन करू शकतात, अशी भीती असल्याने संजय राऊत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. मात्र, राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सर्व खासदार एकत्र आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबतच राहतील. मिडियामध्ये चुकीचे चित्र उभे केले जात आहे. ४ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित ५ खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि फोनद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
भाजपवर टीका करताना राऊत संतापून म्हणाले, भाजपकडून पक्ष फोडण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे, जे लोकशाहीसाठी घातक आहे. पण आमचा दिवस जेव्हा येईल, तेव्हा पक्ष कसा फोडला जातो हे आम्ही दाखवून देऊ.
खासदार अनिल देसाई यांनीही बंडाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. तर संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेला ६० वर्षांचा इतिहास आहे. आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमदार-खासदार येतात आणि जातात, पण शिवसेना पक्षाचे अस्तित्व कायम राहते.
ही बातमी वाचा ….
Uddhav Thackeray : खासदारांसोबतच ठाकरेंचे आमदार देखील करणार बंड? आकडा आला समोर







