Operation Tiger : ठाकरेंच्या ‘या’ खासदाराला मिळणार केंद्रात मंत्रिपद? संभाव्य नाव समोर…
Operation Tiger : मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराकडे असल्यामुळे, आगामी काळात दिल्लीत मोदी मंत्रिमंडळात मराठवाड्याच्याच एका खासदाराला केंद्रात राज्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

Operation Tiger : राज्यात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला आता नवे वळण मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान आता मंत्रिपदावरूनच या हालचाली रखडल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. (Operation Tiger)
मंत्रिपदासाठीच अडले का समीकरण?
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातून वेगळा होण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या गटाने केंद्रात एका राज्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची चर्चा असली, तरी त्या एका पदासाठीच गटातील ३ ते ४ खासदार इच्छुक असल्याने अंतर्गत रस्सीखेच सुरू झाल्याचे बोलले जात आहे. (Operation Tiger)
६ खासदारांचा गट असल्याचा दावा
राजकीय सूत्रांच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील ६ खासदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहे. या गटाचे नेतृत्व मराठवाड्यातील एका वरिष्ठ खासदाराकडे असल्याचीही चर्चा आहे. मात्र या हालचालींबाबत संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. (Operation Tiger)
बैठकीत मंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत?
सूत्रांच्या माहितीनुसार, या संभाव्य गटाची अंतर्गत बैठकही पार पडली असून त्यामध्ये केंद्रात मंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मंत्रिपदाबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याची चर्चा असली, तरी त्या पदासाठी एकापेक्षा अधिक खासदार इच्छुक असल्याने अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. (Operation Tiger)
अद्याप अधिकृत घोषणा नाही
गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असली, तरी ठाकरे गटातील खासदार फुटणार किंवा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच मंत्रिपदाबाबतही संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या घडामोडी प्रामुख्याने राजकीय चर्चांवर आणि सूत्रांच्या माहितीनुसार असल्याचे मानले जात आहे. (Operation Tiger)![]()
मराठवाड्यातील एका खासदाराला मिळणार मंत्रिपद?
सध्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 3 लोकसभा खासदार आहेत. संजय आष्टीकर पाटील – हिंगोली, संजय जाधव – परभणी, ओमराजे निंबाळकर – धाराशिव हे तीन खासदार आहेत. या गटाचे नेतृत्व मराठवाड्यातील एक खासदार करत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Operation Tiger)





