Gulabrao Patil | Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन गाडी राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतली. या गाडीत जवळपास ५ कोटींची रक्कम असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.
मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेली गाडी हिरे शिंदे गटाच्या आमदाराची असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरूनच आता विरोधी गटकसुन सत्ताधारी शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेल्या रक्कमेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “पुण्यातील खेड-शिवापूर भागात दोन गाड्या होत्या. त्यामध्ये १५ कोटी रुपये होते. तुम्हाला माहिती असेल की, मी आआधी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ५०-५० कोटी रुपये देण्याचे काम करत आहेत.
त्यातील हा १५ कोटींचा पहिला हप्ता जात होता. जी गाडी पकडली त्यामध्ये सांगोल्याच्या आमदारांसाठी पहिला हप्ता जात होता. त्यामध्ये ५ कोटींचा हिशेब लागला. त्यातील १० कोटी सोडून देण्यात आले. एक फोन आला त्यानंतर एक गाडी सोडून देण्यात आली”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सध्या या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रुरु असून, आता जळगावमधून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ५ कोटींची रक्कम सापडली आहे. आणि ५० कोटी कसे आणि कुठून येतील. काय कमाल आहे, असा सवाल त्यांनी केला. हप्ते खाणाऱ्याला हप्तेच समजतात, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांना लगावला आहे.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
या प्रकरणावर शहाजीबापू पाटील म्हणाले की, “तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या स्थरातील आहेत. शिवापूर टोलनाक्यावर एका गाडीत ५ कोटी रुपयांची रक्कम सापडल्याची बातमी मी टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळालं. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटूंबातील कुणाचीही नाही,” असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले.
पुढे त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. “संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडं दिसतात, सकाळी उठताना डोंगर दिसतात. सातत्यानं मला फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.