Peshwai Creation : ‘पेशवाई क्रिएशन’चा वर्धापन दिन थाटात साजरा..!

पुणे : ‘अनुभूती नाविन्याची, परंपरा शाही वस्त्रांची’ या ओळी अगदी तंतोतंत लागू होणारे पुण्यातील वस्त्र खरेदीचे ठिकाण म्हणजे पेशवाई क्रिएशन. ज्याच्या नावातच घरंदाजपणा आणि वस्त्रांचा साज आहे असे हे पेशवाई दालन. पुण्यनगरीला अत्यंत साजेसे असे नाव पेशवाई क्रिएशन. लग्न समारंभ असो किंवा कोणतेही सण असोत, ग्राहकांची पाऊले आपसूकच पेशवाईकडे वळतात.
नुकताच पेशवाईने आपला ३१ वा वर्धापन दिवस आपल्या ग्राहकांसोबत मोठ्या उत्साहाने साजरा केला. ३१ वर्षां पूर्वी, श्री. दत्तात्रय पेदण्णा येमूल यांनी एक भव्य – दिव्य स्वप्न पहिले. त्यांच्याकडे कापड उद्योग क्षेत्रातला अतिशय प्रदीर्घ अनुभव गाठीशी होता. या अनुभवाचा फायदा ग्राहकांना वाजवी दरात अत्त्युत्तम दर्जाची आणि वैविध्यपूर्ण वस्त्र श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी १९९३ साली पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली.
अतिशय विनम्र सेवा, वाजवी दर आणि निवडीला भरपूर वाव ह्या वैशिष्ट्यांमुळे पेशवाई अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे 1993 साली स्थित झालेले पेशवाई हे वस्त्र दालन सर्वांच्याच परिचयाचे आहे. ३१ व्या वर्धापनदिनी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तसेच यंदाच्या वर्षी, लग्नाचे मुहूर्त बरेच असल्याने आता देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
पेशवाई म्हणजे अत्यंत नाविन्यपूर्ण साड्या, मनमोहन डिजाईन आणि भरपूर व्हरायटी इत्यादीची खात्री. नेहमीच वेगवेगळी डिजनाईन्स मध्ये उपलब्ध असलेलया इथल्या साड्यांची रंगसंगती, कलाकुसर ही मन मोहून टाकणारी असते. साड्यांची भरपूर व्हरायटी इथे उपलब्ध आहे. पेशवाई पैठणी ही इथली खासियत म्हणता येईल.
त्याच सोबत पैठणी, गढवाल, कांजीवरम, बनारसी, नारायनपेठी या पारंपरिक प्रकारांसोबत अनेक आधुनिक डिझायनर, वर्कच्या साड्या व लेहंगा व घागरा देखील पेशवाई मध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणूनच कोणताही सण उत्सव असो, साड्यांची खरेदी ही फक्त पेशवाई मध्ये केली जाते. लग्नासाठी चा खास बस्ता तसेच नववधू साठी खास साड्या पेशवाई मध्ये आहेत.
पेशवाईचा ३१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास – १९९३ ते २००० सालापर्यंतच्या पेशवाईच्या प्रवासात उत्तम सेवा आणि अत्त्युत्तम दर्जा यामुळे ग्राहकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत गेला. या कालावधीमध्ये पेशवाई आणि ग्राहकांमध्ये एक अनोखा स्नेहबंध तयार झाला ग्राहक म्हणजे जणू पेशवाईची चालती बोलती जाहिरातच ठरू लागले.
ह्या प्रचंड प्रतिसादामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी २००० साली कुमठेकर रस्त्यावर ५००० स्वेअर फूट चे भव्य वस्त्रदालन सुरु केले आणि मग पेशवाईची वाटचाल प्रगती पथावर सुरू झाली. २००० साली नव्या वास्तुत स्थलांतरित झालेल्या ‘पेशवाई क्रिएशन’ च्या वस्त्रदालनास सर्व प्रकारच्या ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला.
विशेषतः लग्न बस्त्याच्या खरेदीसाठी पुणे आणि पुण्याबाहेरील ग्राहकांची पेशवाई ला पहिली पसंती मिळत होती. खरेदीला येणाऱ्या पुरुष ग्राहकांची गैरसोय होऊ लागल्यामुळे ‘पेशवाई क्रिएशन्स’ समोरच ‘पेशवाईज् श्रीमंत कलेक्शन’ हे पुरुषांसाठीच्या वस्त्रखरेदीसाठीचे भव्य दालन सुरु केले.
‘पेशवाईज् श्रीमंत कलेक्शन’ मध्ये पारंपारिक आणि इंडो वेस्टर्न पोषाखाबरोबरच धोती-कुर्ता, उपरणे, जोधपुरी, जॅकेट्स तसेच शर्ट्स, टी- शर्ट्स, ट्राउजर, जीन्स व ब्रँडेड रेडीमेड्स अशा वस्त्रप्रावरणांची विपुल श्रेणी उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीचतच ‘पेशवाईज् श्रीमंत कलेक्शन’ ग्राहकांचे आवडते वस्त्र दालन झाले. इथे खास पुरुषांसाठी भरपूर वस्त्रांची व्हरायटी उपलब्ध केली आहे. आकर्षक कुर्ते, सलवार कमीज याच सोबत धोती, जोधपुरी, असे अनेक प्रकार इथे उपलब्ध आहेत.
डेली वेअर साठी भरपूर कलेक्शन श्रीमंत मध्ये बघायला मिळते. याच सोबत मोजडी पासून ते फेट्यांपर्यंत इथे सर्वच मिळते. सन 2019 मध्ये पेशवाईनगर येथे नवीन शाखा उघडली. दिवसागणिक पेशवाई मध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचा ओघ वाढतच आहे. ग्राहकांची विश्वासार्हता हीच पेशवाईची मोठी संपत्ती आहे.
आज बाहेरगावाहून पेशवाई मध्ये खरेदीला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. पेशवाई मध्ये मिळणारी सर्व्हिस देखील अत्यंत चांगली आहे. पेशवाई मध्ये खरेदी म्हणजे खरेदीचा मनसोक्त आनंद आणि खरेदीचे आत्मिक समाधान. सण उत्सव वा असो मंगलकार्य, वस्त्र खरेदीसाठी फक्त पेशवाईच..





