Monsoon Update : मान्सून पुन्हा मंदावला; शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग लागले दाटू
Monsoon Update : धरणांच्या पाणीसाठ्यात काहिशी वाढ झाली, तर पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या अनेक भागांना दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनचा वेग मंदावल्याने राज्यासमोर नव्या चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.

Monsoon Update : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पुनरागमन करत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना झोडपून काढले. अनेक भागांत मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली. (Monsoon Update)
धरणांच्या पाणीसाठ्यात काहिशी वाढ झाली, तर पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या अनेक भागांना दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनचा वेग मंदावल्याने राज्यासमोर नव्या चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. (Monsoon Update)
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या एल निनो या हवामान घटनेचा परिणाम मान्सूनवर दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवसांतही पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Monsoon Update)
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पेरण्या रखडले होते. अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरण्या पुढे ढकलल्या होते. (Monsoon Update)
मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. (Monsoon Update)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार एल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणारी असामान्य वाढ आहे. या बदलाचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. (Monsoon Update)
भारतात अनेकदा एल निनो सक्रिय झाल्यानंतर मान्सून कमकुवत होण्याची किंवा पावसाचे असमान वितरण होण्याची शक्यता वाढते. यामुळे काही भागांत कमी पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. (Monsoon Update)
सध्या राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी व्यापक आणि जोरदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. दरम्यान, एल निनोच्या प्रभावावर हवामान तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष असून मान्सूनच्या पुढील वाटचालीवर त्याचा परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Monsoon Update)
Monsoon Care: पावसाळ्यात केस का गळतात? ‘ही’ कारणं जाणून घ्या आणि वेळेत उपाय करा






