Rain Updates : राज्यभरात मान्सूनचा हाहाकार; पावसाचा जोर वाढला, ‘या’ ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
Rain Updates : जून महिन्यात चकवा देणारा पाऊस अखेरच्या टप्प्यात सक्रिय असून राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Rain Updates : जून महिन्यात चकवा देणारा पाऊस अखेरच्या टप्प्यात सक्रिय असून राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासांत मुंबईसह उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. (Rain Updates)
या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून सखल भागात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Rain Updates)
मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. तसेच नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क आणि तुळींज परिसरात पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी जागृत मंडळ शाळेत पाणी शिरले, ज्यामुळे खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडण्यात आले. (Rain Updates)
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 8 तासांत तब्बल 82.76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव आणि कोपरी बारा बंगला परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. (Rain Updates)
नवी मुंबईतील सानपाडा परिसरात रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले असून अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. माणगावजवळील मुगवली फाटा आणि ढालघर फाटा परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आले होत. (Rain Updates)
दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने उद्याही रेड अलर्ट कायम ठेवल्याने जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. (Rain Updates)
मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर उर्वरित विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. (Rain Updates)
Arrival of the rains: शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, तापमान घसरले
Northeast Rain : आसाम-अरुणाचलमध्ये पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित






