Sanjay Raut : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण? पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? यासंह विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र आले पाहिजे, असा सूर अनेक नेत्यांकडून आवळला जात आहे. या सगळ्यावर उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत मांडले. “त्या बाईने पती गमावला, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय, त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूधारा आहेत आणि त्यावर आता तुम्ही कोण नेतृत्त्वं करणार यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे,” असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. अजित पवारांच्या पार्थिवाला कालच अग्नि दिला, त्यांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. तरी कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा : Shriya Saran: ‘साउथची अभिनेत्री’ असा शिक्का बसण्यावर श्रिया सरनचं स्पष्ट मत; उत्तराने टीकाकारांना केलं शांत तळागाळाचे कार्यकर्तेसुद्धा रडत होते अशा स्थितीत किमान पुढील 15 ते 20 दिवस राजकीय चर्चा करणं सर्वस्वी अमानुष आहे. अशा स्थितीत त्यांच्या पक्षांतर्गत विषयांवर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांच्या कुटुंबातील निर्णांवर आम्ही मत व्यक्त करणं योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांच्यानंतर ज्या काही राष्ट्रवादी पक्षाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? “या विषयावर आता बोलणं योग्य नसून, कोणी या विषयावर बोललं असेल तर ते माणुसकीशुन्य आहेत. मग ते मंत्री असो किंवा आमदार असो. त्या बाईने पती गमावला, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय, त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूधारा आहेत आणि त्यावर आता तुम्ही कोण नेतृत्त्वं करणार यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे. यावर मी बोलणार नाही. सगळं स्थिरस्थावर झाल्याशिवाय चर्चा नको.” नुकतेच राज्य सरकारने अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, त्यांनी DCGA च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दादांवर इतकं प्रेम असेल तर… भाजपनं दादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि यातलं काही ते सिद्ध करू शकले नाहीत. पंतप्रधानांनी हा आरोप केला. माझी विनंती आहे की दादांवर इतकं प्रेम असेल तर दादांवर केलेले आरोप मागे घ्या ही श्रद्धांजली असेल. ही विनंती आहे, राजकीय मागणी नाही. असे संजय राऊत यांनी सांगिंतले. हेही वाचा : Narahari Jirwal : सुनेत्रा पवार यांंना उपमुख्यमंत्री करा! आता नरहरी झिरवाळांचे दुसरे मोठं वक्तव्य म्हणाले….