ST Bus Employees : दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
ST Bus Employees : दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC) अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

ST Bus Employees : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) मोठा दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे, यासाठी राज्य शासनाने मंगळवारी ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. (ST Bus Employees)
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सणापूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. महामंडळाकडे १५ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचा ताफा असून दररोज सुमारे ५५ लाखांहून अधिक प्रवासी एसटीने प्रवास करतात. (ST Bus Employees)
सप्टेंबर महिन्यातच या निधीला मंजुरी मिळाली होती, मात्र त्याचा अधिकृत शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सहसा दरमहा ७ ते १० तारखेदरम्यान वेतन मिळते. यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने पगार त्वरित अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी शासन व महामंडळाने समन्वयाने काम करावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. (ST Bus Employees)
एसटी कामगार संघटनेची नाराजी
दरम्यान, राज्य शासनाने मंजूर केलेला हा निधी अपुरा असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. पूर्ण वेतनासाठी किमान ५६० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगत ते म्हणाले, या तुटपुंज्या रक्कमेतून केवळ हातात पडणारे निव्वळ वेतन दिले जाऊ शकते. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि इतर वैधानिक देणी यातून भागवता येणार नाहीत. शासनाने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची निराशा केली आहे. (ST Bus Employees)
ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी
Pune Crime: आत्महत्या की घातपात? १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूने पुण्यात खळबळ; ६ जणांवर गुन्हा


