ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी
Traffic congestion : कुरूळीजवळ पुणे-नाशिक एसटी बस बंद पडल्याने महामार्गावर चार तास वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

Traffic congestion : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरूळी गावाच्या हद्दीत पुणे-नाशिक एसटी बस अचानक बंद पडल्याने सोमवारी (दि. १५) तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली. बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिककडे जाणारी एसटी बस कुरूळी हद्दीत आली असता तिच्यात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बस महामार्गाच्या मध्यभागीच थांबली. या मार्गावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असल्याने बस बंद पडताच मागील वाहनांचा मार्ग अडला. काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी झाली.
बस बंद पडल्याने प्रवाशांनाही खाली उतरावे लागले. दरम्यान, कोंडीमुळे नोकरदार, व्यावसायिक तसेच इतर वाहनधारक अडकून पडले. वाहने इंच-इंच पुढे सरकत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. (ST bus fail )

ST bus fail : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस बंद; कुरूळीजवळ चार तास वाहतूक कोंडी
दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, बंद पडलेली बस बाजूला करण्यासाठी क्रेन वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर क्रेनच्या मदतीने बस रस्त्याच्या कडेला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
ऐन गर्दीच्या वेळी तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांमधून प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.





