Heavy Vehicles : राज्यातील अवजड वाहनांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय
Heavy Vehicles : महाराष्ट्र सरकारने नियम २४९ मध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मालवाहू ट्रकला क्लीनर ठेवण्यापासून सूट दिली आहे.

Heavy Vehicles : राज्य सरकारने मालवाहू ट्रक चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अवजड वाहनांना आता यापुढे क्लीनर किंवा मदतनीस ठेवण्याची सक्ती नसेल. (Heavy Vehicles)
ज्या वाहनांमध्ये अत्याधुनिक ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम बसवलेली असेल, अशा वाहनांना महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४९ मधून विशेष सवलत देण्यात आली असून, यासंदर्भातील अधिसूचना गृह विभागाने नुकतीच राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ट्रान्सपोर्ट संघटनांकडून मॅनपॉवरचा तुटवडा आणि क्लीनरच्या पगाराचा वाढता आर्थिक भार या कारणास्तव ही मागणी केली जात होती. नव्या निर्णयानुसार, ज्या वाहनांमध्ये ३६०-डिग्री व्हिजन कॅमेरा बसवलेला असेल, त्यांनाच ही सवलत लागू होईल. (Heavy Vehicles)
हा कॅमेरा वाहनाच्या सभोवतालचा परिसर, विशेषतः ब्लाइंड स्पॉट्सचे थेट चित्रण चालकाला स्क्रीनवर दाखवेल, तसेच वाहनाजवळ एखादी वस्तू किंवा व्यक्ती आल्यास चालकाला सावध करण्यासाठी प्रॉक्सिमिटी अलार्म आणि रिव्हर्स घेताना बाह्य ध्वनी यंत्रणा असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र, अति-अवजड साहित्य वाहून नेणारे आर्टिक्युलेटेड सेमी-ट्रेलर आणि हायड्रोलिक ट्रेलर यांना अद्यापही मदतनीस सोबत ठेवणे बंधनकारक असेल. या निर्णयामुळे वाहतूकदारांवरील आर्थिक बोजा कमी होणार असून रस्ते सुरक्षा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Heavy Vehicles)





