Maharashtra Election 2024 : निवडणूक काळात जालन्यात 1 कोटीची रोकड जप्त
Updated On:

Maharashtra Election 2024 – जालना पोलिस दलाने आचारसंहिता काळात 1 कोटी 7 लाख 55 हजार 570 रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाया वाढविल्या आहेत.
दरम्यान, कारवाया करीत असताना 2 कोटी 32 लाखांचा अवैध मद्य, गांजा, गुटखाही जप्त करण्यात आला आहे. अवैध शस्त्रांबाबत कारवाया करीत असताना 32 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवायांमुळे एकच खळबळ उडाली आहे.





