SMAT 2025 : रोमांच शिगेला! शेवटच्या चेंडूवर विजयासाठी खेळाडूने मारला शॉट, पण त्याचवेळी क्षेत्ररक्षकाने दाखवली चपळाई, अन्…

शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा थरारक विजय –
या सामन्यात तामिळनाडूने दिल्लीसमोर विजयासाठी १९९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. हा सामना इतका अटीतटीचा झाला की, शेवटच्या चेंडूपर्यंत तो २ धावांवर येऊन पोहोचला. म्हणजेच, दिल्लीला सामना जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती, तर चेंडू गुरजपनीत सिंग याच्या हातात होती आणि स्ट्राइकवर होता हिम्मत सिंग (३ चेंडूत ५ धावा).
गुरजपनीतने शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि हिम्मतने तो चेंडू हवेत डीप पॉइंटच्या दिशेने फटकावला. डीप पॉइंटवर तामिळनाडूचा स्टार खेळाडू शाहरुख खान उपस्थित होता. त्याने शानदार उडी मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
A CRAZY FINISH IN SYED MUSHTAQ ALI TROPHY.
– Shahrukh Khan almost pulled off a blinder, but Himmat Singh’s smash goes for a six when 2 were needed on the last ball.
pic.twitter.com/zyOeaPg6Du— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 28, 2025
परिणामी, दिल्लीला ६ धावा मिळाल्या आणि त्यांनी हा सामना ६ विकेट्सने आपल्या नावावर केला. या रोमांचक क्षणाचा व्हिडीओ बीसीसीआयनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Ayush Mhatre Century : कर्णधार बनताच आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! रोहित शर्माचा मोडला जागतिक विक्रम
यश धूलची मॅच-विनिंग खेळी –
या सामन्यात दिल्लीच्या विजयात यश धूल याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने सलामीला येत ४६ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची दमदार खेळी साकारली. त्याला प्रियांश आर्या (१५ चेंडूत ३५ धावा) आणि कर्णधार नितीश राणा (३४ धावा) यांची चांगली साथ मिळाली. याशिवाय, अखेरीस आयुष बडोनीने २३ चेंडूंमध्ये ४१ धावा ठोकत दिल्लीला हे मोठे लक्ष्य गाठण्यात मदत केली.





