Maharashtra CM : राज्यात राष्ट्रपती राजवट शक्य ! सरकार स्थापनेविषयी अजूनही स्पष्टता नाही
Updated On:

President’s rule – राज्याच्या मावळत्या विधानसभेचा कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात आला. मात्र, अजूनही नव्या सरकारच्या स्थापनेविषयी स्पष्टता आलेली नाही. नवे सरकार तातडीने अस्तित्वात न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळावली आहे.
महायुतीने अभूतपूर्व यश मिळवून राज्याची सत्ता राखली. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून पेच निर्माण झाल्याने नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया रखडल्याचे सूचित होत आहे.
त्यामुळे अल्पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हे आहेत. नवे सरकार स्थापण्याच्या हालचाली झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट हटवली जाईल. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल.





