Mumbai Cricketers : मुंबईच्या ‘लाडक्या’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान! सूर्या-शिवमचा वर्षा बंगल्यावर पार पडला सत्कार समारंभ
Mumbai Cricketers : मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खेळाडूंचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

Suryakumar Yadav Shivam Dube CM Visit 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विश्वविजेतेपदावर नाव कोरणारे ‘मुंबईकर’ खेळाडू सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जंगी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खेळाडूंचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
“महाराष्ट्रासह देशाची मान अभिमानाने उंचावली”
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाच्या अष्टपैलू कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “भारताने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. विशेषतः सूर्यकुमारचे नेतृत्व आणि शिवम दुबेची स्फोटक फलंदाजी व अचूक गोलंदाजी विजयासाठी निर्णायक ठरली. मुंबईच्या या सुपुत्रांनी केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. त्यांच्या या यशातून कोट्यवधी तरुणांना प्रेरणा मिळेल.”
Indian T20 captain Suryakumar Yadav and cricketer Shivam Dube met Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and his wife Amruta Fadnavis.
(Source: CM Office) pic.twitter.com/FU0I38BJKG
— IANS (@ians_india) March 10, 2026
विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर –
Legislative Assembly unanimously passed a resolution congratulating Team India for winning the ICC Men’s T20 World Cup.
Heartiest congratulations to captain Suryakumar Yadav and the entire Team India!आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदनाचा प्रस्ताव… pic.twitter.com/RyKCIMEKss
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2026
मुख्यमंत्र्यांनी केवळ वैयक्तिक भेटच घेतली नाही, तर राज्य विधानसभेत भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्तावही मांडला, जो सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा विजय म्हणजे ‘सांघिक भावना, शिस्त आणि आत्मविश्वासाचा संगम’ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफचेही त्यांनी अभिनंदन केले.
दोन्ही खेळाडूंचा विश्वचषकात डंका –
या स्पर्धेत सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलत ९ सामन्यांत २४२ धावा फटकावल्या. दुसरीकडे, शिवम दुबेने फिनिशरची भूमिका चोख बजावत १६९.०६ च्या स्ट्राईक रेटने २३५ धावा कुटल्या आणि महत्त्वाच्या क्षणी विकेट्सही मिळवल्या. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून तिसऱ्यांदा (२००७, २०२४, २०२६) विश्वचषक उंचावला आहे.





