Jasprit Bumrah Slower Ball : ‘बुमराहला मी गोलंदाजी शिकवली…’, भारताने विश्वविजेतेपद पटकावताच पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा मोठा दावा
Jasprit Bumrah Slower Ball : वेगवान गोलंदाज झहूर खानने दावा केला आहे की, बुमराहला ही विशेष स्लोअर डिलिव्हरी विकसित करण्यात त्यानेच मदत केली होती

Jasprit Bumrah Slower Ball Technique : जसप्रीत बुमराह सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक गोलंदाज मानला जातो. त्याच्याकडे इनस्विंग, आऊटस्विंग आणि अचूक यॉर्कर आहेच, पण त्याची ‘स्लोअर यॉर्कर’ फलंदाजांसाठी कोडं ठरते. आता संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) वेगवान गोलंदाज झहूर खानने दावा केला आहे की, बुमराहला ही विशेष स्लोअर डिलिव्हरी विकसित करण्यात त्यानेच मदत केली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
२०१९ च्या आयपीएलमधील ‘ती’ भेट
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या झहूर खानने एका मुलाखतीत सांगितले की, २०१९ च्या आयपीएल दरम्यान तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून काम करत होता. त्यावेळी युएईमध्ये प्रचंड उष्णता आणि ओस (Dew) मुळे बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि कूल्टर-नाईल यांसारख्या दिग्गज गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळवणे कठीण जात होते. झहूरने सांगितले की, “बुमराह आधीही स्लोअर बॉल टाकत असे, पण त्यासाठी त्याला ॲक्शन बदलावी लागत असे. मी त्याला एकाच ॲक्शन आणि ग्रिपसह स्लोअर बॉल टाकण्याची कला शिकवली.”
कोच शेन बॉन्डही झाले होते थक्क –
🚨 JASPRIT BUMRAH LEARN SLOWER BALLS FROM ME — PAK PACER ” ZAHOOR KHAN” 🚨
Zahoor Khan🗣️-“ During the 2019 IPL , Mumbai Indians hired me in Dubai , I taught jasprit bumrah how to bowl — ” Slower balls” and ball grip, before this he didn’t know 🤯 ”
— Kiara (@crickiara) March 11, 2026
झहूरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने सराव सत्रात एकाच ॲक्शनने स्लोअर बाऊन्सर टाकला, तेव्हा मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी कोच शेन बॉन्ड आश्चर्यचकित झाले. बॉन्ड यांनी श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेला बोलावून सांगितले की, “हे क्रिकेटमधील काहीतरी नवीन तंत्र आहे. हा मुलगा एकच आर्म स्पीड ठेवून चेंडूचा वेग कमी करत आहे.”
बुमराहने स्वतः विचारली ग्रिप –
🚨🚨SHOCKING REVEALATION ABOUT JASPRIT BUMRAH BY A PAKISTANI BORN UAE CRICKETER ZAHOOR KHAN.!!!
Zahoor Khan said that Jasprit Bumrah has learned his slower delivery variation from me back in 2019 when I played with him in Mumbai Indians.
He said that I bowled a maiden over to… pic.twitter.com/mAtzsGZDMj
— 𝐀. (@was_abdd) March 10, 2026
झहूरने पुढे सांगितले की, “बुमराहने मला विचारले, ‘पाजी, तुमची ग्रिप काय आहे ते मला दाखवा.’ मी त्याला माझे तंत्र दाखवले आणि सांगितले की यात ॲक्शन बदलता कामा नये. बुमराहने त्याचा सराव केला आणि तो म्हणाला की, ‘हे नेक्स्ट लेव्हल तंत्र आहे.’ इतका मोठा स्टार असूनही त्याने माझ्याकडून काहीतरी शिकण्यात संकोच केला नाही, याचे मला खूप कौतुक वाटते.” झहूर खानच्या या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.





