Maharashtra Budget 2026 : भोर-मुळशी-राजगडसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद; ‘या’ ८ कामांसाठी ४२.७५ कोटींचा निधी मंजूर
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ८ प्रमुख कामांसाठी ४२ कोटी ७५ लाखांची तरतूद; आमदार शंकर मांडेकर यांची माहिती.

Maharashtra Budget 2026 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात भोर-मुळशी-राजगड तालुक्यातील आठ रस्ते व पुलांच्या कामांसाठी 42 कोटी 75 लाख 71 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. हा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे. संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाईल.
निधीची तरतूद झालेली प्रमुख कामे पुढीलप्रमाणे :
कासुर्डे-हातवे-तांभाड-वेल्हे-धानेप-कादवे-पानशेत (कि.मी. 47 ते 53) रस्ता सुधारणा, ता. राजगड – 2 कोटी 50 लाख रुपये. दासवे-मुठा-कोंढुर-वरसगाव-पानशेत (कि.मी. 18 ते 23, लव्हार्डे ते खारवडे) रस्ता सुधारणा, ता. मुळशी – 5 कोटी रुपये. वांद्रे-वडूस्ते-वाघवाडी ते प्ररामा-5 (कि.मी. 0 ते 5, पिंपरी फाटा ते वडूस्ते) रस्ता सुधारणा, ता. मुळशी – 2 कोटी 50 लाख रुपये.
प्रजिमा-44 ते भोलावडे-शिंद-महुडे-भानुदसरा (किमी 0 व 7) रस्ता सुधारणा – 7 कोटी रुपये. रामा-119 ते काळेवाडी-किकवी-बांदलवाडी-काळदरी (किमी 7.5 ते 11) रस्ता सुधारणा – 3 कोटी रुपये. महाड-मढेघाट-वेल्हे-नसरापूर-चेलाडी फाटा (किमी 13 ते 18.2 व 39 ते 39.6) रस्ता सुधारणा- 5 कोटी रुपये.
दासवे-मुठा-कोंढुर-वरसगाव-पानशेत (किमी 32 ते 45, कोंढुर फाटा-जांभळी-कुरण फाटा-पानशेत) रस्ता सुधारणा- 10 कोटी रुपये. रा.मा. 106 कोदवडी-आसनी-दामगुडा रस्ता, ग्रामा-7 कालंदी नदीवर पुल बांधकाम – 7 कोटी 75 लाख 71 हजार रुपये.





