Maharashtra Bandh : मोठी बातमी..! 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक! ‘हा’ बडा नेता मैदानात
Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीने (VBA) येत्या २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची मोठी हाक दिली आहे.

Maharashtra Bandh : दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी (VBA) ने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. (Maharashtra Bandh)
वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे पक्षाचे मत असून लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Bandh)
पक्षाचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर तसेच केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध केला. त्यांनी राज्यभर आणि देशभर होणाऱ्या आंदोलनांमध्ये विद्यार्थी, सुजाण नागरिक आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे म्हटले आहे. (Maharashtra Bandh)
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी संसदेतही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी आंदोलन छेडले असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इतर नेत्यांसह निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Bandh)
आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली आहे. इतर प्रमुख राजकीय पक्ष या बंदमध्ये अधिकृतपणे सहभागी होणार की नाही, याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. (Maharashtra Bandh)






