Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच; बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये
Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पालघरमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : पालघर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश पिंपळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
प्रथमेश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे पालघरमधील भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
यावेळी पालघर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार ॲड. रवींद्र गडग, हेमांगी भगत, पालघर वाहतूक सेनेचे माजी शहराध्यक्ष सचिन राऊत, माजी युवा सेना शहरप्रमुख सतीश शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर शहर सचिव विशाल पवार, बहुजन विकास आघाडीचे रविंद्र पिंपळे, पुष्पक पाटील, केतन मोरे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Politics)
पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप हा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख निर्णय घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे भाजपबद्दलचा विश्वास वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Maharashtra Politics)
या पक्षप्रवेशामुळे पालघरमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे कार्यालय जाळले; राज्यात मोठी खळबळ






