नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीमध्ये काही दिग्गजांसह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमधून भाजपने एक मोठी खेळली खेळली आहे. या यादीमध्ये भाजपने शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या एका बड्या नेत्याला तिकीट देऊन त्याला धर्मसंकटात टाकले आहे. ‘या’ नेत्याला दिले तिकीट शरद पवार गटात वाटेवर असलेला हा बडा नेता म्हणाजे गणेश नाईक आहे. गणेश नाईक यांना भाजपने ऐरोली मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघावर गणेश नाईक यांनी दावा केला होता. जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या यादीत ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांना तर बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे आता संदीप नाईक हे तुतारी हाती घेत बेलापूर मधून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.