विधानसभा निवडणूक: बारामतीच्या आखाड्यात 23 उमेदवार नशीब आजमावणार

बारामती : बारामती विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे बारामतीच्या आखाड्यात २३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे, गणेश मारुती खामगळ, पंकज बापूराव भिसे, धनंजय पोपाट गडदरे, राहुल बाळासाहेब थोरात, दत्तात्रय बबन जराड, दादा एकनाथ थोरात, त्रिशला मिलिंद कांबळे व पंढरीनाथ बाळासो रसाळ या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावाडकर तसेच तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित अनंतराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युगेंद्र श्रीनिवास पवार, बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत दादू खरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे संदीप मारुती चोपडे, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे अनुराज आदिनाथ खलाटे, वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास तुकाराम निकाळजे, संभाजी ब्रिगेडचे शिवश्री विनोद शिवाजीराव जगताप, समता पार्टीचे सोहेल शहा युनुस शहा शेख, अपक्ष म्हणून कल्याणी सुजित कुमार ,वाघमोडे, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले, अब्दुल रोफ उर्फ रजाक जाफर मुलाणी, अभिजीत महादेव काळे, अमोल नारायण चौधर, अमोल युवराज आगवणे, कौशल्या संजय भंडलकर , जयसिंग शिवाजीराव कोकरे,चोपडे सीमा अतुल, मिथुन सोपानराव आटोळे, विक्रम भरत कोकरे, सचिन शंकर आगवणे, सविता जगन्नाथ शिंदे, संतोष पोपटराव कांबळे व संभाजी पांडुरंग होळकर हे उमेदवार रिंगणात आहेत.





