Chhagan Bhujbal : मी ज्या पक्षात होतो तेथे मान मिळत होता; छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य

नाशिक : काही दिवसांपूर्वी महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी अनेक नेत्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेदेखील नाव आहे. महायुतीमध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा असताना अचानक त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. यामुळे ते नाराज झाले आहेत.
पक्षावर व्यक्त केली नाराजी
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. आपल्याला संधी मिळाली नसल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलीय. नाराजी व्यक्त करताना आपल्याला पक्षात वागणूक योग्य प्रकारे मिळत नसल्याचा आरोपही माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच मी ज्या पक्षात होतो त्यात मला मान मिळत होता, असेदेखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.
निर्णय फक्त तिघांमध्ये होतो
नाशिकला आपल्याला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे, आपण जो निर्णय घेऊ तो मान्य असेल. आपण मंत्रिपद मिळालं म्हणून नाराज नाही,तर पक्षात मिळत अपल्याला चांगली वागणूक मिळत नाहीये. पक्षात फक्त तीन लोकांमध्ये म्हणजेच अजित पवार आणि पटेल, सुनील तटकरे यांच्यात निर्णय होतोय. विशेष म्हणजे स्वतः फडणवीस बावनकुळे यांनी मंत्री मंडळात नाव घेण्यासाठी आग्रह होते, असंही छगन भुजबळ म्हणालेत. काही लोकांना शब्द दिला म्हणून माझ्यावर अन्याय झाला असेदेखील छगन भुजबळ म्हणाले.
सुप्रिया सुळेंची अजित पवार गटावर टीका
छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्यात आल्याने सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली आहे. तसेच शरद पवार गटात असताना छगन भुजबळ यांना योग्य तो आदर दिला जात होता असा दावादेखील सुप्रिया सुप्रिया सुळेंनी केला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले सुप्रिया ताई बोलले ते खरे आहे त्यांच्या बाजूला माजी खुर्ची असायची. मी ज्या पक्षात होतो त्यात मला मान मिळत होता.





