‘प्रियंकांच्या एन्ट्रीमुळे महाभारत सुरू होणार’; राष्ट्रीय लोकदलाची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi । Wayanad – लोकसभेच्या दोन जागांवरून विजयी झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय जाहीर केला असून तेथून आता त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहे.
या नव्या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय लोकदलाने प्रतिक्रिया दिली आहे. असे वाटते की आता महाभारत सुरू होईल असे या पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना रालोदचे मलूक नागर म्हणाले २० वर्षांपासूनची अपेक्षा आणि २० वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर आता प्रियंका गांधी यांची इच्छा पूर्ण होते आहे. पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांचीही भविष्यवाणी खरी होताना दिसते आहे की प्रियंका गांधी यांच्याशिवाय कॉंग्रेस पक्ष पुढे जाऊच शकत नाही.
मात्र विचार करण्याची गरज आहे की २० वर्षांपासून त्या उत्तर प्रदेशात सक्रिय होत्या. अमेठी आणि रायबरेलीच्या त्याच इन्चार्ज होत्या. मात्र आता त्यांना दक्षिणेतील केरळमध्ये पाठवण्यात आले आणि राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश आपल्या हातातच ठेवले. यावरून असे वाटते की आता आतल्या आत महाभारत सुरू होते आहे.





