Satara | “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत बामणोलीत महास्वच्छता अभियान

बामणोली, (प्रतिनिधी)- “स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत बामणोली येथे “महास्वच्छता अभियान” राबविण्यात आले. जावळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर दि. 19 रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेन वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शालेय विद्यार्थी,
ग्रामस्थ, गावस्तरीय सर्व शामकीय व निमशासकीय कर्मचारी स्वयंसेवी संस्था यांची पथके तयार करून महास्वच्छता अभियान राबविण्याबाबत तसेच महास्वच्छता अभियान उपक्रमासाठी झाडू,
कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, मॅनिटायझर, फावडे, घमेली. साहित्य व घंटागाडी उपलब्ध करण्यात यावी, अशी सूचना होत्या.
तसेच गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी. गोळा झालेला कचरा इतरत्र पडणार नाही, विस्कटला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, त्याचप्रमाणे गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी,
पाणीपुरवठा स्त्रोतांची स्वच्छता करणे व दुरुस्ती करण्यात यावी, गावातील तुंबलेली गटारे वाहती करणे, कुठेही डबके साचू नये व गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणी स्रोतांची स्वच्छता करणेत यावी,
अशा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार बामणोली येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी बामणोली गावचे सपरंच श्रीमती गोरे, ग्रामसेवक राऊत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते.





