Satara | कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू

बामणोली (वार्ताहर) – गेल्या आठवड्यापासून कास पठार वर तुरळ प्रमाणात फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील काहीच प्रमाणात फुले आलेली आहेत.
फुलांचा हंगाम सुरू झाला असून गेल्या आठवड्यापासून कास पठारा वर तुरळक प्रमाणात गुलाबी तेरडा, सीतेचे अश्व, टोपली करावं, व गेंद यासारखी फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे.
जागतिक वारसा स्थळ म्हणून सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून कास पुष्प पठाराची ओळख आहे. कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध प्रकारची फुले येतात.
ही फुले पाण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक व निसर्गप्रेमी कास पठार येथे भेट देत असतात. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फुले भरण्याचा हंगाम पुढे गेला आहे. गेल्या आठवड्यापासून कास पठार वर तुरळ प्रमाणात फुले फुलण्यास सुरुवात झाली आहे.
ही फुले पाण्यासाठी पर्यटकांनी गेल्या आठवड्यापासून गर्दी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस आहे तसेच कास पठार येथील फुलांचा हंगाम सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्याचा असतो.
परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सप्टेंबर महिना सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील काहीच प्रमाणात फुले आलेली आहेत. तसेच फुलांचा हंगाम सुरू झाला असून कास पठार समिती यांनी लोकांना उभे राहण्यासाठी निवारा शेड व पार्किंगची व्यवस्था पुरेपूर तयारी केली आहे.
सद्यस्थितीत कास पठारावर गुलाबी तेरडा, सीतेचे अश्व,टोपली करावं, व गेंद या सारखी फुले फुलण्यास सुरुवात झाली असून कास पठारावरील फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे.





