महाकुंभमेळ्यात पुन्हा आग; वाहनांंनी घेतला पेट; अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल

Mahakumbh Fire | उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी महाकुंभमेळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन पार्क केलेल्या वाहनांना आग लागली. पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, एक वाहन पूर्णपणे जळून खाक झाली असून दुसरी कार अर्धी जळाली आहे.
शनिवारी सकाळी वाहनांच्या आगीची माहिती देताना अग्निशमन सेवा अधिकारी विशाल यादव म्हणाले की, ”
दूरवरून भाविक येथे येत आहेत आणि त्यांनी त्यांची वाहने येथे पार्क केली आहेत. प्रचंड उष्णतेमुळे आग लागली. आम्हाला सकाळी साडेसहाच्या सुमारास माहिती मिळाली की मारुती एर्टिगा आणि व्हेन्यू कारला आग लागली आहे. सहा अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब पाठविण्यात आले आणि आग नियंत्रित आणली. या आगीत कोणालाही इजा झाली नाही. सर्वजण सुरक्षित आहेत.” Mahakumbh Fire |
#WATCH | Uttar Pradesh: Fire broke out in 2 vehicles in Prayagraj. Several fire tenders at the spot to douse the fire. More details awaited pic.twitter.com/GsZmqphNBr
— ANI (@ANI) January 25, 2025
यापूर्वी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात आग लागली होती. महाकुंभ मेळ्यात सेक्टर-१९ येथील मोरी मार्गावरील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये १९ जानेवारीच्या संध्याकाळी आगीची घटना घडली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. ही आग सिलेंडरमुळे लागली होती. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरल्याने संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट निर्माण झाली होती.
#WATCH | Prayagraj, UP: Fire Officer Vishal Yadav says, “…Devotees are coming from far-flung areas and have parked their vehicles here. The fire broke out due to extreme heat. Fire engines have reached the spot and the fire has been controlled. The Ertiga car is completely… https://t.co/MCzvzobgIo pic.twitter.com/r4yykFzIWv
— ANI (@ANI) January 25, 2025
10 कोटींहून अधिक भाविकांचे संगमस्नान
राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ४८.७६ लाखांहून अधिक भाविक प्रयागराज येथील महाकुंभात पोहोचले होते. शुक्रवारी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्या एकूण भाविकांची संख्या 58.76 लाख होती. महाकुंभात आतापर्यंत 10 कोटींहून अधिक भाविकांनी संगमस्नान केले आहे. Mahakumbh Fire |
हेही वाचा:





