Madhuri Misa: “श्रद्धा, सेवा अन् आधुनिकतेचा सुंदर संगम!” अन्नछत्र मंडळाच्या उपक्रमांचे माधुरी मिसाळ यांच्याकडून कौतुक
Madhuri Misa: अक्कलकोट दौऱ्यादरम्यान माधुरी मिसाळ यांनी घेतले स्वामींचे दर्शन; अन्नछत्र मंडळाकडून श्रींची मूर्ती व कृपावस्त्र देऊन विशेष सन्मान.

Madhuri Misa – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्रद्धेला आधुनिकतेची जोड देत विविध उपक्रम राबविले जात आहेत. न्यासाचे हे कार्य कौतुकास्पद असून, समाजसेवेला अध्यात्माची भक्कम जोड देण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते त्यांचा श्रींची मूर्ती व कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधला जात असल्याचे मिसाळ यांनी नमूद केले.
संस्थेच्या कार्याला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, मोहन डांगरे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमास पुरोहित संजय कुलकर्णी, सिद्धाराम टाके, तानाजी पाटील, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.





