Pandya Brothers Fight : हार्दिकसोबतच्या नात्यावर कृणालचं ‘ते’ रहस्यमयी हास्य; मैदानातील ‘त्या’ बाऊन्सरने वादावर शिक्कामोर्तब! पाहा VIDEO
Pandya Brothers Fight : आयपीएल २०२६ च्या हंगामात पंड्या ब्रदर्समध्ये 'ऑल इज नॉट वेल' असल्याचे संकेत मिळत आहेत.

Hardik Krunal Pandya Brothers fight : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे पंड्या बंधू, म्हणजेच हार्दिक आणि कृणाल पंड्या यांच्यातील नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी सध्या क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) अष्टपैलू खेळाडू क्रृणाल पंड्या याला जेव्हा हार्दिकसोबतच्या संबंधांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने दिलेले उत्तर अधिक संभ्रम वाढवणारे ठरले आहे.
हार्दिक आणि क्रृणाल पंड्या यांची जोडी भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध जोडी मानली जाते. मात्र, आयपीएल २०२६ च्या हंगामात त्यांच्यातील ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे संकेत मिळत आहेत. आरसीबीच्या डिजिटल शोमध्ये ‘मिस्टर नाग्स’ने (दानिश सैत) जेव्हा क्रृणालला हार्दिकसोबतच्या समीकरणाबद्दल विचारले, तेव्हा त्याने कोणतेही स्पष्टीकरण देण्याऐवजी फक्त मोठं-मोठ्याने हसू लागला. क्रृणालचे हे मौन आणि केवळ हसून विषय टाळणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
🔴 HARDIK PANDYA INFRONT OF KRUNAL 🤣
Mr. Nags🎙️: You were with RCB family and that’s why you didn’t come to see another family member which is me.
Krunal Pandya🎙️: Yeah, I mean sometimes there are a lot of family members you have right in the house. Sometimes you miss some.… pic.twitter.com/43Xto2bAMK
— Sam (@Cricsam01) April 22, 2026
आक्रमकता आणि बाऊन्सरचा मारा –
या वादाची ठिणगी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान पडली. सामन्यात दोन्ही भाऊ एकमेकांशी संवाद टाळताना दिसले. विशेष म्हणजे, क्रृणालने हार्दिकला एक अतिशय वेगवान बाऊन्सर फेकला, ज्यावर हार्दिकनेही आश्चर्याने प्रतिक्रिया दिली. आपल्या भावाकडून अशा आक्रमकतेची अपेक्षा हार्दिकला नसावी, असे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होते.
हार्दिकच्या विकेटनंतरचा जल्लोष –
सर्वात धक्कादायक बाब तेव्हा घडली जेव्हा हार्दिक बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता. हार्दिकच्या विकेटमध्ये क्रृणालचा थेट सहभाग नसतानाही, त्याने ज्या पद्धतीने आक्रमक जल्लोष केला, त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. यापूर्वीच्या हंगामात एकमेकांना मिठी मारणारे आणि आनंद साजरा करणारे हे दोन भाऊ यावेळेस एकमेकांपासून लांब राहणे चाहत्यांना खटकत आहे. कौटुंबिक वाद आता क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचला आहे की काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.





