LSG vs GT : शुबमन-साईचा मोठा पराक्रम! IPL 2025 मध्ये केला खास विक्रम

LSG vs GT Shubman Gill and Sai Sundarshan new record : आयपीएल २०२५ चा २६वा सामना १२ एप्रिल रोजी लखनौ येथे यजमान एलएसजी आणि जीटी यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना गिल आणि सुदर्शनच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्ससमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. या दरम्यान गिल-सुदर्शन जोडीने एक मोठा विक्रम केला आहे. त्याचबरोबर ही जोडी आयपीएल २०२५ मध्ये हा खास पराक्रम करणारी पहिलीच जोडी आहे.
या सामन्यात गुजरातकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शानदार फलंदाजी केली. त्यांनी आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी एक मोठा विक्रमही केला. गुजरातच्या या सलामीवीरांनी पहिल्या विकेट्ससाठी शंभरहून अधिक धावांची भागीदारी केली. अशाप्रकारे, दोन्ही फलंदाज आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी शतकी भागीदारी करणारे पहिले खेळाडू बनले. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी १२.१ षटकांत १२० धावांची भागीदारी केली.
गिल आणि सुदर्शनने आयपीएल २०२५ मध्ये केला मोठा पराक्रम –
Innings Break!
A brilliant comeback by the home side bowlers 👏
That leaves #LSG to get 1⃣8⃣1⃣ runs for the 𝗪 🎯
Scorecard ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/W9ArpvzBOe
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
आयपीएल २०२५ मध्ये गिल आणि सुदर्शन यांच्या आधी, एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी एलएसजीसाठी पहिल्या विकेट्ससाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली होती. दोघांनीही ९९ धावांची भागीदारी केली. त्याच वेळी, आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी सर्वात जास्त धावांची भागीदारी करणाऱ्यांमध्ये विराट कोहली आणि फिलिप सॉल्टची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानविरुद्ध या दोघांनी ९५ धावांची भागीदारी केली होती.
हेही वाचा – LSG vs GT : लखनौला मोठा धक्का! गुजरातविरुद्धच्या सामन्यातून मिचेल मार्शने अचानक घेतली माघार
आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेट्ससाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या –
१. गिल आणि सुदर्शन – जीटी १२० – एलएसजी
२. मारक्रम आणि मार्श – एलएसजी ९९ – केकेआर
३. कोहली आणि सॉल्ट – आरसीबी ९५ – केकेआर
४. जैस्वाल आणि सॅमसन – आरआर ८९- पीबीकेएस
हेही वाचा – LSG vs GT : गुजरात मोठा झटका! स्टार खेळाडू IPL 2025 मधून पडला बाहेर
सामन्याबद्दल बोलायचे तर, गुजरातकडून कर्णधार शुबमन गिलने ३८ चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याचा सहकारी सलामीवीर साई सुदर्शनने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. ज्यामुळे गुजरातने २० षटकांत ६ गडी गमावून १८० धावा केल्या. शेवटच्या ८ षटकांत ६ विकेट गमावल्यानंतर गुजरातला फक्त ६० धावा करता आल्या. लखनौकडून शार्दुल ठाकूरने चार षटकांत ३४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईनेही चार षटकांत ३६ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.





