Jos Buttler Record : ‘जोस द बॉस’चा मोठा धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच इंग्लिश खेळाडू
Jos Buttler Record : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने गुजरात टायटन्स समोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले.

Jos Buttler 300 Catches T20 Record : आयपीएल २०२६ च्या २५ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जोस बटलर याने एक मोठा मैलाचा दगड गाठला आहे. यष्टीमागे चपळाई दाखवत बटलरने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या ३०० झेलचा (Catches) टप्पा पूर्ण केला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू ठरला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर केकेआर विरुद्ध खेळताना दुसऱ्याच षटकात जोस बटलरने कागिसो रबाडाच्या चेंडूवर अंगकृष रघुवंशीचा झेल पकडला. या एका झेलसह बटलरच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये आता ३०१* झेलची नोंद झाली आहे. ३५ वर्षीय बटलरने २००९ मध्ये आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती. आजचा त्याचा हा ४९८ वा सामना होता.
यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक म्हणून दुहेरी कामगिरी –
Jos Buttler reaches 300 T20 catches.
Well done 👏 #GTvsKKR pic.twitter.com/FB4fqFpbvJ
— IPL2026 (@IPL2026__) April 17, 2026
बटलरच्या या विक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने हे ३०० झेल केवळ यष्टीरक्षक म्हणून नव्हे, तर क्षेत्ररक्षक म्हणूनही घेतले आहेत. त्याने यष्टीमागे २१६ झेल टिपले असून ८५ झेल हे मैदानावर क्षेत्ररक्षण करताना घेतले आहेत. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर ५३ स्टंपिंगचीही नोंद आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना संजू सॅमसन यष्टीरक्षण करायचा, तेव्हा बटलर सीमारेषेवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना दिसायचा.
जगातील केवळ ४ खेळाडूंच्या नावावर विक्रम –
Safe houses? No, just these guys. 🧤 🔒
Kieron Pollard leads the pack with a staggering 405 catches, proving that “catches win matches” isn’t just a cliché—it’s a lifestyle. Who’s your favorite fielder on this list?[ Kieron Pollard, David Miller, Quinton de kock, Jos Buttler,… pic.twitter.com/NJmz7k9pJU
— SportsTiger (@The_SportsTiger) April 17, 2026
टी-२० क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक झेल घेण्याचा विक्रम आतापर्यंत मोजक्याच खेळाडूंना जमला आहे:
- किरॉन पोलार्ड: ४०५ झेल (७३५ सामने)
- डेव्हिड मिलर: ३३२ झेल (५६१ सामने)
- क्विंटन डिकॉक: ३१६ झेल (४४० सामने)
- जोस बटलर: ३०३ झेल (४९८ सामने)
केकेआरचे दमदार कमबॅक –
या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच केकेआरवर दबाव टाकला. पहिल्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणेला मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात रघुवंशी बाद झाला, तर पावरप्ले संपण्यापूर्वीच टिम सिफर्टलाही तंबूत परतावे लागले. केकेआरची अवस्था ३ बाद अशी झाली होती. त्यानंतर केकेआरने कॅमरुन ग्रीनच्या वादळी ७९ धावांच्या जोरावर कमबॅक करत १८० धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात जोस बटलरने चार झेल पकडले.





