LSG vs GT : शार्दुल-पूरनने रोखला गुजरातचा विजयरथ! लखनौने साधली विजयाची हॅट्ट्रिक

LSG vs GT Lucknow Super Giants beat Gujarat Titans by 6 wickets : सर्वांच्या अपेक्षा खोट्या ठरवत, लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२५ मध्ये आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या फलंदाजीतील अपयशानंतरही, लखनौने या हंगामात चौथा विजय मिळवला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, एलएसजीने शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला.
लखनौने रोखला गुजरातचा विजयरथ –
अशाप्रकारे, सलग चार विजयांनंतर गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला, तर लखनौने सलग तिसरा विजय नोंदवला. गुजरातच्या विजयाचे तारे निकोलस पूरन आणि एडेन मार्कराम होते, ज्यांनी स्फोटक अर्धशतके झळकावली. त्याच वेळी, शार्दुल ठाकूरसह इतर गोलंदाजांनीही संघासाठी उत्तम पुनरागमन केले. एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजीतही त्याच कहाणीची पुनरावृत्ती झाली.
https://twitter.com/IPL/status/1911061329252659254
दोन्ही संघांनी एकमेकांना दिले जशास तसे उत्तर –
गुजरातने प्रथम फलंदाजी केली आणि संघाने पहिल्या १० षटकांत १०० धावा केल्या पण त्यानंतर, लखनौच्या गोलंदाजांनी पुढील १० षटकांत उत्तम पुनरागमन केले. त्याचप्रमाणे, जेव्हा लखनौ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्यांनीही १० षटकांत १०० धावा पूर्ण केल्या पण यानंतर, गुजरातच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकात सामना रोमांचक बनवला.
हेही वाचा –LSG vs GT : शार्दुल-पूरनने रोखला गुजरातचा विजयरथ! लखनौने साधली विजयाची हॅट्ट्रिक
पुन्हा एकदा कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरातसाठी दमदार सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावली आणि संघाला फक्त १० षटकांत १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दोघांमध्ये फक्त १२.१ षटकांत १२० धावांची भागीदारी झाली, जी या हंगामात कोणत्याही विकेट्ससाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे. पण शुबमन गिल १३ व्या षटकात बाद झाला आणि येथून लखनौच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. गुजरातच्या विकेट्स एकामागून एक पडत राहिल्या आणि धावगतीही कमी होत गेली. शार्दुल ठाकूरने शेवटच्या षटकात सलग दोन चेंडूवर रदरफोर्ड आणि तेवतिया यांना बाद करून गुजरातला १८० धावांवर रोखले.
हेही वाचा – LSG vs GT : जोस बटलरविरुद्ध शार्दुल-दिग्वेश जोडीचा जलवा! VIDEO होतोय व्हायरल!
आयुष बदोनीने चौकार-षटकार मारुन मिळवला दिला विजय –
मिचेल मार्श सामन्याबाहेर राहिल्यामुळे लखनौचा कर्णधार ऋषभ पंत सलामीसाठी आला. यावेळी त्याच्या बॅटमधून काही धावा आल्या पण तरीही गरजेनुसार त्या पुरेशा नव्हत्या आणि तो ७ व्या षटकात बाद झाला. पण दुसरीकडे, एडेन मारक्रमने धावांचा वर्षाव केला आणि २६ चेंडूत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्यासोबत आलेल्या निकोलस पूरनने षटकारांचा पाऊस पाडला आणि फक्त २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. दोघांनीही ११ षटकांत संघाला १२० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मारक्रम १२ व्या षटकात बाद झाला, तर पूरन १६ व्या षटकात बाद झाला. येथून, गुजरातने फिरकीपटूंच्या मदतीने पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना जिंकला पण शेवटी, आयुष बदोनीने चौकार आणि एक षटकार मारून संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.





