LPG Gas New Price : एलपीजी गॅसच्या किमतीत घट; एका सिलेंडरसाठी किती पैसे मोजावे लागतील जाणून घ्या?

LPG Gas Cylinder New Price : दि. १ ऑगस्टपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती बदलल्या आहेत. आजपासून, १९ किलोचा एलपीजी सिलिंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ३३.५० रुपये कमी द्यावे लागतील. आजपासून, दिल्लीमध्ये किरकोळ विक्री किंमत १६३१.५० रुपये झाली आहे. मात्र, दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
तेल कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले :
दर महिन्याच्या सुरुवातीला देशात अनेक नियम बदलले जातात. १ ऑगस्टपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही घट झाली आहे. या बदलानंतर किरकोळ विक्री किंमत १६३१.५० रुपये झाली.
Oil marketing companies have revised the prices of commercial LPG gas cylinders. The rate of 19 kg commercial LPG gas cylinders has been reduced by Rs 33.50 effective from tomorrow. In Delhi, the retail sale price of a 19 kg commercial LPG cylinder will be Rs 1631.50 from August…
— ANI (@ANI) July 31, 2025
तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करून अपडेट दिले आहे. ज्यामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पाचव्यांदा झाली घसरण :
जानेवारी ते मार्च या काळात गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ दिसून आली होती. त्यानंतर एप्रिलपासून सलग ५ वेळा किंमत घसरत आहे. १ जुलै रोजी सिलेंडरमध्ये ५८.५० रुपयांची घसरण दिसून आली आहे. यासोबतच, १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीतही कोणताही बदल दिसून येत नाही.
आज सकाळी सोन्याच्या किमतीतही थोडीशी घसरण दिसून येत आहे. आतापर्यंत २४ कॅरेट सोन्यात प्रति १० ग्रॅम १० रुपयांची घसरण दिसून येत आहे. आज १० ग्रॅम सोने १,००,१७० रुपयांना उपलब्ध आहे. काही तासांत सोन्याच्या किमतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.




