Arunachal Pradesh BJP Manifesto| भारतीय जनता पक्षाने बुधवारी 10 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रात तरुण आणि महिलांना 25,000 नोकऱ्या आणि 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बुधवारपासून अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान निकोबारच्या दोन दिवसीय निवडणूक दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर जेपी नड्डा गुरुवारी सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. यावेळी जेपी नड्डांसह अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडूही उपस्थित होते.
निवडणुक जाहीरनामादरम्यान, नड्डा म्हणाले की, “पक्ष ‘अरुणाचल गति शक्ती मास्टर प्लॅन’ लागू करेल. ज्या अंतर्गत रस्ते, रेल्वे आणि हवाई या पायाभूत सुविधांना राज्यभर चालना दिली जाईल. शाळा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड स्थापन केला जाईल.
जाहीरनाम्यात नेमकं काय? Arunachal Pradesh BJP Manifesto|
– राज्यात भाजपच सरकार स्थापन झाल्यास पक्ष विकास, परिवर्तन आणि समरसतेचे प्रतीक असलेल्या डीटीएच मॉडेलवर काम करेल.
– किसान सन्मान निधी अंतर्गत, शेतकऱ्यांना सध्याच्या 6,000 रुपयांच्या तुलनेत 9,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
– अरुणाचल गति शक्ती मास्टर प्लॅन लागू करेल. ज्या अंतर्गत राज्यभर रस्ते, रेल्वे आणि हवाई पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले जाईल.
– राज्यातील तरुण आणि महिलांना सरकारी आणि गैर-सरकारी क्षेत्रात २५,००० नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले.
– प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्यासह राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणखी 1,000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला जाणार आहे.
– इटानगरमध्ये एक आयटी पार्क उभरणार, ज्यामुळे २,००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
– आगामी निवडणुकीत सत्तेवर आल्यास राज्यात एलपीजी सिलिंडर ४०० रुपयांना देण्यात येईल.
– पोलिस कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवास सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासनही पक्षाने दिले.
– राज्यातील आदिवासी गटांच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक मेळा आयोजित केला जाईल
– ‘एक जमाती एक विण’ धोरण सुरू केले जाईल ज्या अंतर्गत कारागिरांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान केले जाईल.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा:
काय सांगता …! भाजप उमेदवाराने निवडणूक प्रचारादरम्यान महिलेचे घेतले ‘चुंबन’