Deepak Tilak passes away : लोकमान्य टिळकांचे पणतू डॅा. दिपक टिळक यांचे निधन; वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Deepak Tilak passes away : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॅा. दिपक टिळक यांचे आज वृद्धपकाळाने वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. १६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
आज सकाळी 8 ते 11 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता वैंकुठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. दीपक टिळक विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय योगदान दिले आहे. यामध्ये शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांचा समावेश होता.
डॅा. दिपक टिळक यांच्याविषयी…
डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. त्यांनी केसरीचे विश्वस्त संपादकपद भूषविले आहे. काही काळ ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून त्यांना जपानी भाषेच्या प्रसारासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.





