Lok Sabha Result 2024 (Nandurbar) : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निकालाचे चित्र स्पष्ट आहे. नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांचा काँग्रेसचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी (ADV. GOWAAL KAGADA PADAVI) यांनी दारूण पराभव केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी (Gowaal Padvai) यांनी तब्बल 1 लाख 59 हजार 120 मतांनी विजय मिळवला आहे. सुरुवातीला काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबारमध्ये भाजपने सलग दोनवेळा सत्ता मिळवली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र पालटलेलं दिसत आहे. गोवाल पाडवी यांनी नंदुरबारमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, भाजपनं नंदुरबारमधून सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित (DR. HEENA VIJAYKUMAR GAVIT) यांचीच उमेदवारी कायम ठेवली होती. तर काँग्रेसनं त्यांच्या विरोधात अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं होतं. हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते. मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर परत एकदा काँग्रेसनं कब्जा केला आहे. अंतिम निकालाची आकडेवारी – 1. अँड. गोवाल पाडवी (INC) : 7 लाख 45 हजार 998 2. डाॅ. हिना गावित (BJP) : 5 लाख 86 हजार 878 3. आनंदा कोळी (BSP) : 10 हजार 644 Lok Sabha Result 2024 (Raigad) : अजित पवारांना दिलासा, रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी… गेल्या निवडणुकीत काय घडले? डॉ. हिना गावित यांनी 2014 मध्ये माणिकराव गावितांचा पराभव करून खासदारकी मिळवली होती. त्यानंतर 2019 मध्येही भाजपनं हिना गावित यांनाच उमेदवार म्हणून नंदुरबारमधून मैदानात उतरवलं होतं. तर काँग्रेसनं त्यांचे अनुभवी नेते के.सी.पाडवी यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. पाडवी यांनी हिना गावित यांना निडणुकीत चांगलीच टक्कर दिली होती. पण डॉ. हिना गावित यांनी जवळपास एक लाख मतांच्या फरकानं के.सी. पाडवी यांचा पराभव केला होता.