Lok Sabha Election: मतदानाच्या दिवशी “एलओसी’वर गोळीबाराची शक्यता; मतदान अधिकाऱ्याचा “प्लॅन बी’ तयार

पूंछ (जम्मू आणि काश्मीर) – जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ मतदानाच्या दिवशी पाकिस्तानी हद्दीतून गोळीबार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा आकस्मिक स्थितीला तोंड देण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांनीही पर्यायी व्यवस्था तयार ठेवली आहे. त्यांनी आयत्यावेळी मतदान केंद्रे बदलण्याचीही येाजना आखली आहे.
अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाच्या कक्षेत येणाऱ्या पूंछ जिल्ह्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे. या जिल्ह्यात एकूण ४४७ मतदान केंद्रे आहेत. पूंछमध्ये मेंढर, हवेली आणि सुरनकोट या तीन विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.
एकूण मतदान केंद्रांपैकी ५४ मतदान केंद्रे प्रत्यक्ष सीमा रेषेच्या जवळ आहेत आणि ती पाकिस्तानी बाजूकडून होणाऱ्या गोळीबाराच्या रेंज मध्ये आहेत. मतदानाच्यावेळी गोळीबार झालाच तर मतदार आणि मतदान अधिकाऱ्यांना बंकर्स मध्ये हलवून त्यांना सुरक्षीत करण्याची योजना आम्ही आखली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





