लॉकडाउन 2.0 : केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली नवी नियमावली

नवी दिल्ली – देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी केली आहेत. ३ मे देशात कुठेही हवाई, रेल्वे आणि आंतरराज्य प्रवास होणार नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या नियमावलीमध्ये शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, सब यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. या नियमावलीमध्ये देण्यात आलेल्या सवलती या हॉटस्पॉट आणि सील प्रदेशांना लागू होणार नाहीत. हे हॉटस्पॉट्स फक्त आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांद्वारेच राहतील, असेही स्पष्ट केले आहे.
या सेवांना सवलती
यानुसार रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे, मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.
Ministry of Home Affairs (MHA) issues National Directives for #COVID19 management. Wearing of face cover is compulsory in all public places, workplaces. Spitting in public places shall be punishable with fine. pic.twitter.com/14Y7zq9vqp
— ANI (@ANI) April 15, 2020




