Noskova Wimbledon Title : टेनिस विश्वाला मिळाली नवी चॅम्पियन! लिंडा नोस्कोव्हाने कॅरोलिना मात करत पहिल्यांदाच पटकावलं विम्बल्डनच जेतेपद
Noskova Wimbledon Title : टेनिस विश्वातील सर्वात मानाच्या विम्बल्डन २०२६) च्या महिला एकेरीच्याअंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाने (Linda Noskova) नवा इतिहास रचला आहे.

Linda Noskova Win Wimbledon 2026 Womens Singles Title : टेनिस विश्वातील सर्वात मानाच्या विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) च्या महिला एकेरीच्या (Womens Singles) अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या २१ वर्षीय लिंडा नोस्कोव्हाने (Linda Noskova) नवा इतिहास रचला आहे. तिने अंतिम फेरीत आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हाचा (Karolina Muchova) ६-२, ५-७, ६-३ असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. तब्बल दोन तास चाललेल्या या थरारक महामुकाबल्यात नोस्कोव्हाने दबावाच्या क्षणी अप्रतिम संयम राखत कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम आणि पहिले विम्बल्डन जेतेपद पटकावले.
दुसऱ्या सेटमधील थरार अन् निर्णायक सेटमध्ये मारली बाजी –
लिंडा नोस्कोव्हाने सामन्याची धडाकेबाज सुरुवात करत पहिला सेट ६-२ असा सहज खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्येही तिने ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती आणि ती विजयाच्या अगदी उंबरठ्यावर होती. मात्र, अनुभवी मुचोव्हाने चमत्कारिक पुनरागमन करत सलग गेम जिंकून दुसरा सेट ७-५ ने आपल्या नावावर केला. यामुळे सामना तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये पोहोचला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र नोस्कोव्हाने आधीची चूक उधळून लावली. तिने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत ५-२ अशी आघाडी घेतली. मुचोव्हाने एक गेम जिंकून लढत देण्याचा प्रयत्न केला, पण नोस्कोव्हाने स्वतःची सर्व्हिस राखून ६-३ ने सेटसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजयानंतर ती कोर्टवरच भावुक होऊन बसली.
LINDA NOSKOVA. GRAND SLAM CHAMPION 🏆#Wimbledon pic.twitter.com/8hu4T7kRV5
— Roland-Garros (@rolandgarros) July 11, 2026
आकडेवारीमध्येही नोस्कोव्हाच अव्वल –
Heart. Desire. Belief.
After a stunning final on Centre Court, Linda Noskova is the 2026 Ladies’ Singles Champion#Wimbledon pic.twitter.com/CDk1Oi3QmS
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2026
संपूर्ण सामन्यात लिंडा नोस्कोव्हाने प्रत्येक विभागात वर्चस्व राखले. तिने सामन्यात १० एस (Ace) मारले, तर मुचोव्हाला केवळ ६ एस मारता आले. पहिल्या सर्व्हिसवर नोस्कोव्हाने ७४ टक्के गुण मिळवले आणि १३ पैकी ४ ब्रेक पॉईंट्स पदरात पाडून घेतले. तिने एकूण १०९ गुण कमावले, तर मुचोव्हाला ९२ गुणांवर समाधान मानावे लागले.
पेट्रा क्वितोवाचा १४ वर्षांचा मोडला रेकॉर्ड –
From one Czech champion to another 🤝🇨🇿#Wimbledon pic.twitter.com/IUd56G3jFc
— Wimbledon (@Wimbledon) July 12, 2026
या ऐतिहासिक विजयासह लिंडा नोस्कोव्हा चेक प्रजासत्ताकची दिग्गज खेळाडू पेट्रा क्वितोवानंतरची (Petra Kvitova) सर्वात तरुण विम्बल्डन चॅम्पियन ठरली आहे. क्वितोवाने २०११ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी विम्बल्डन जिंकले होते आणि योगायोगाने आज ती स्वतः सेंटर कोर्टवर बसून नोस्कोव्हाच्या या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनली होती. या विजेतेपदामुळे नोस्कोव्हा डब्ल्यूटीए (WTA) क्रमवारीत तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा सातव्या स्थानावर पोहोचणार आहे.





