नेता छोडो, अब कार्यकर्ता भी बेशरम Shame… ; कुणाला कामरा प्रकरणावर अंजली तिवारींची पोस्ट चर्चेत
Updated On:

Sangeeta Tiwari | काल दिवसभर माध्यमांमध्ये स्टॅन्डअप कॅामेडियन कुणाला कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्यांवर मोठा वादंग निर्माण झाला. शिवसेना शिंदे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील ज्या स्टुडिओत कामराने गाणं गायलं होतं. त्या स्टुडिओची तोडफोड केली. विधानसभेत देखील कामरा विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला.
राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी कामराने गायलेल्या गाण्याचा विपर्यास झाल्याचे म्हटले आहे. यामुळे कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गायलेल्या गाण्याविषयी वांदग आणि समर्थन अशा दोन्ही स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. याची सध्या चर्चा केली जात आहे. एका व्यंगचित्रकारने काढलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे.
नेता छोडो, अब कार्यकर्ता भी बेशरम हो गये है! छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज आम्हाला माफ करा. आमच्यासाठी पहिला नेता आणि मग तुम्ही आहात. Shame Shame Shame. अशी एक पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर करत याविषयी आपली भूमिका मांडली.





