Maharashtra Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्यांनी साथ सोडत भाजपमध्ये केला प्रवेश

वाशिम : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. निवडणुकीचा प्रचार संपायला काही दिवस शिल्लक असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वाशिममध्ये उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजाभैय्या पवार आणि गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील राजाभैय्या पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराची ताकद वाढल्याचे समजत आहे.





