टिक टॉकला टक्कर देणारे नवीन अॅप लॉन्च

नवी दिल्ली – कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अॅपवर बंदी आणली आहे.
दरम्यान, आता याचा फायदा घेत ‘म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म गानातर्फे हॉटशॉट्स’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. हे व्हिडिओ अॅप टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहे. चिनी अॅप टिक टॉकला बंदी घातल्यानंतर त्याच्या तोडीच्या अॅपच्या सर्वजण शोधात आहेत. लोकांची ही गरज ओळखून या अॅप ची निर्मिती करण्यात आली.
या अॅपमध्ये असलेल्या आकर्षक टूल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना शॉर्ट व्हिडिओज् आणि स्टोरीज तयार करता येईल. यातील ‘हॉटशॉट चॅलेंज’मुळे म्युझिक, कॉमेडी आणि डान्सच्या माध्यमातून युजर्सना डिजिटल मनोरंजन क्षेत्रात आपले नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. आतापासून अनेक सेलिब्रेटी हॉटशॉट्स अॅपशी जोडले गेले आहेत.






