टिकटॉक भारतात पुन्हा सुरू होणार? वेबसाइट सुरू झाल्याचा दावा, मोदी सरकारने केला खुलासा

TikTok Back In India | टिकटॉकवरील पाच वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा भारतात सुरू करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही युजर्सनी टिकटॉकच्या वेबसाइटचे होमपेज उघडत असल्याचा दावा केला आहे. यामुळे टिकटॉक भारतात पुन्हा परत येऊ शकते का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक सुरू होणार का? असा सवाल केला जात आहे. यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, टिकटॉकवरील बंदी उठवण्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही.
काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, या चर्चानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने ट्वीट करत लिहिले की, ‘भारतात चीनची कंपनी ‘टिकटॉक’ ची वेबसाइट पुन्हा सुरू झाली आहे. चीनबरोबरच्या संघर्षात आपले 20 शूर जवान शहीद झाले. प्रथम नरेंद्र मोदी यांनी चीनला क्लीन चिट दिली. पण जेव्हा काँग्रेसने दबाव टाकला, तेव्हा हेडलाइन्स मॅनेज करण्यासाठी ‘टिकटॉक’ वर बंदी घालण्यात आली.’
पुढे काँग्रेसने म्हंटले की, ‘आता मोदी पुन्हा चीनशी जवळीक साधत आहेत. त्यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली आणि स्वतः चीनला जाणार आहेत. याच दरम्यान टिकटॉकशी संबंधित ही बातमी समोर आली. यावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी यांचे चीन प्रेम देशप्रेमावर भारी पडले आहे. पाकिस्तानबरोबरच्या सीजफायरप्रमाणे चीनबरोबरही सौदा केला आहे.’ TikTok Back In India |
भारत सरकारचा खुलासा
भारत सरकारने चीनचे शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील बंदी हटवलेली नाही. बंदी हटवण्यासाठी कोणताही आदेश दिला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ANIने सरकारी सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकवरील बंद हटवण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. टिकटॉक, AliExpress आणि Shein या सारखे ॲप अनब्लॉक केल्याची वृत्त समोर येत होती. त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. TikTok Back In India |
The Government of India has not issued any unblocking order for TikTok. Any such statement/news is false and misleading: Govt Sources pic.twitter.com/1BxK5jE4xG
— ANI (@ANI) August 22, 2025
भारतात केव्हा घातली बंदी?
टिकटॉकसह इतर 58 चिनी ॲप्सवर जून 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून ही ॲप्स भारतात बंद आहेत. डेटा सुरक्षा आणि खासगी माहितीचा अधिकार या कारणांच्या आधारे यावर प्रतिबंध घालण्यात आले. हा निर्णय भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर घेण्यात आला होता. ही ॲप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकाडदायक ठरत असल्याचे सरकारचे म्हणणे होते. TikTok Back In India |
भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये जवळीक
अलीकडच्या काळात भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये जवळीक वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्यानंतर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले. भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशिवाय या आठवड्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या भेटीत सीमेवर शांतता राखणे, व्यापार पुन्हा सुरू करणे आणि गुंतवणुकीला चालना देणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले गेले.
हेही वाचा:





