Muralidhar Mohol : देशातील सर्वात मोठी विमानसेवा देणारी कंपनी म्हणून इंडिगो एअरलाइन्सकडे पाहिले जाते; पण सध्या या कंपनीच्या कारभारावर टीकेची झोड उठवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह देशातील बंगळुरू, हैदराबाद, कोलकत्ता अशा काही महत्वाच्या शहरांमध्ये इंडिगो विमानांचे उड्डाण आणि लँडिग रद्द करण्यात आली आहेत. यामुळे इंडिगोच्या विस्कळित विमानसेवेचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अशातच इंडिगोच्या विमानसेवेच्या असुविधेचा फायदा इतर कंपन्यानी घेतला असून तिकीटाचे दर तिप्पट वाढवले आहेत. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आता इंडिगो विमानसेवेच्या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून, याबाबत केंद्रीय उड्डाण वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने मागणी आमचा ड्युटी टाईम 10 तासांवरून 8 तास करावा, अशी मागणी केली होती. हायकोर्टाने तसे आदेशही दिले होते, डीजीसीएने तशी अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. इंडिगोने मात्र वेळ तशी पाळली नाही, अशी महत्वाची मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली असल्याचे मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले. या प्रकरणासाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, इंडिगोच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. चार सदस्यांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील मोहोळांनी स्पष्ट केले आहे. नेमकं काय म्हणाले मंत्री मुरलीधर मोहोळ? इंडिगोला सगळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली आहे. 4 सदस्यीय चौकशी समिती त्यासंदर्भात नेमली आहे. डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. इतर विमान कंपन्यांच्या किमतींवर कॅप लावली आहे. शिवाय ज्यांची विमानं रद्द झाली, त्यांना संपूर्ण रिफंड ४८ तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. पुणे विमानतळावर काय परिस्थिती आहे? सध्या तरी पुणे विमानतळावर परिस्थती नियंत्रणात आहे. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणे आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती आहे. पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. हेही वाचा : अखेर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो-केटी पेरीच्या नात्याचा खुलासा ; स्वतः पोस्ट शेअर करत दिली माहिती