Pune Airport : हवाई दलाच्या विमानाचा लँडिंगवेळी बिघाड झाला अन्….; पुणे विमानतळावर मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?
Pune Airport : अपघातानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी मोकळी करून पूर्वस्थितीत आणण्यासाठी सुमारे 4 ते 5 तासांचा कालावधी लागला.

Pune Airport : येथे शुक्रवारी (दि.17) उशिरा रात्री भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. लँडिंगदरम्यान विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे. तसेच नागरी मालमत्तेचेही कोणतेही नुकसान झालेले नाही.
अपघातानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी मोकळी करून पूर्वस्थितीत आणण्यासाठी सुमारे 4 ते 5 तासांचा कालावधी लागला.
दरम्यान, दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले असून शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून विमानांचे लँडिंगही सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनुसार दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले.
शनिवारी दिवसभरात पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर फ्लाइट रडार 24 च्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, पुणे विमानतळावर उतरणारी किमान आठ विमाने सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोईम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आली.
रात्री पोस्टकरून दिली माहिती (Pune Airport )
Pune Airport : हवाई दलाच्या विमानाचा लँडिंगवेळी बिघाड झाला अन्….; पुणे विमानतळावर मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?
रात्री 11.41 वाजता भारतीय हवाई दलाच्या माध्यम समन्वय केंद्राने एका पोस्टमध्ये सांगितले की, या घटनेमुळे धावपट्टी अनुपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही नागरी मालमत्ता खराब झालेली नाही.
हेही वाचा : Iran-US Peace Talks: इराण-अमेरिका यांच्यात चर्चेची दुसरी फेरी केव्हा आणि कुठे होणार? ; वाचा ठिकाण आणि तारीख





