अखेर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो-केटी पेरीच्या नात्याचा खुलासा ; स्वतः पोस्ट शेअर करत दिली माहिती

Trudeau-Katy Perry Relationship। अमेरिकन पॉप स्टार केटी पेरीने अखेर तिच्या वैयक्तिक नात्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी असलेले तिचे नाते मैत्रीच्या पलीकडे गेले आहे. पोस्टमध्ये दोघेही एकत्र आनंदी दिसत आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
केटी पेरी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान तिने ट्रूडोसोबतच्या अनेक संस्मरणीय क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये, दोघे हसत हसत सेल्फी काढताना दिसत आहेत, तर एका व्हिडिओमध्ये ते एकत्र जेवताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. पेरीने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “टोकियो टाइम्स ऑन टूर अँड मॅकिंग मोर…” म्हणजे, “टोकियोमध्ये टूर दरम्यान घालवलेले अनेक खास क्षण.”
जपानच्या माजी पंतप्रधानांनीही या नात्याची दिली कबुली
जपानचे माजी पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या एका विधानाने या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे की जस्टिन ट्रूडो त्यांच्या जोडीदारासोबत जपानला भेट देऊन तिच्यासोबत जेवण केले होते. किशिदा यांच्या विधानामुळे जगभरात त्यांच्या नात्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
カナダのトルドー前首相(@JustinTrudeau)がパートナーと来日され、私たち夫妻と昼食をご一緒しました。
総理時代には首相同士何度もお会いし、カナダ訪問時には「日加アクションプラン」の策定など、二国間関係強化に共に汗をかいた仲です。
こうして交友を続けられていることを嬉しく思います。 pic.twitter.com/t9RkbMyip5
— 岸田文雄 (@kishida230) December 4, 2025
पहिला सार्वजनिक कार्यक्रम Trudeau-Katy Perry Relationship।
ट्रुडो आणि केटी पेरी पहिल्यांदा ऑक्टोबर २०२५ मध्ये पॅरिसमध्ये पेरीच्या ४१ व्या वाढदिवसाच्या समारंभात सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते. तथापि, त्यापूर्वी, जुलै २०२५ मध्ये, ते कॅनडामध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फिरवताना दिसले होते.
हे नाते कधी सुरू झाले? Trudeau-Katy Perry Relationship।
अहवालांनुसार, मॉन्ट्रियलमध्ये भेटल्यानंतर त्यांचे नाते फुलले. तेव्हापासून त्यांनी डेटिंग सुरू केली आणि अनेक खाजगी प्रसंगी एकत्र दिसले.





