Stock Market: आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या शेवटच्या सत्रात (शुक्रवार, १० एप्रिल २०२६) भारतीय शेअर बाजार मजबूत वाढीसह बंद झाला. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्ससोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) या इंडेक्स हेवीवेट कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे बाजाराला चांगला आधार मिळाला. मात्र, अमेरिका-इराण तणाव कायम असल्याने गुंतवणूकदार काहीसे सावधही दिसले. आयटी शेअर्समधील घसरणीमुळे वाढ मर्यादित राहिली. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) ७७,१९८ वर मजबूत सुरुवात करून दिवसात ७७,६२२ पर्यंत पोहोचला. अखेरीस तो ९१८.६० अंकांनी (१.२०%) वाढून ७७,५५०.२५ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty 50) २३,८८० वर उघडून दिवसात २४,०७४ चा उच्चांक गाठला आणि शेवटी २७५.५० अंकांनी (१.१६%) वाढून २४,०५० वर स्थिरावला. टॉप गेनर्स आणि लूजर्स – Stock Market सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये एसियन पेन्ट्स (Asian Paints) सुमारे ३.८४% वाढीसह अव्वल ठरली. त्याचबरोबर आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank), महिंद्रा अॅंड महिंद्रा (Mahindra & Mahindra), इंडिगो (IndiGo), स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India), अॅक्सिस बॅंक (Axis Bank), बजाज फिनसर्व (Bajaj Finserv), बजाज फायनान्स (Bajaj Finance), ट्रेन्ट लिमिटेड (Trent Limited) आणि अदानी पोर्ट्स (Adani Ports) यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. दुसरीकडे सन फार्मा (Sun Pharma), इन्फोसीस (Infosys), टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (Tata Consultancy Services), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि एचसीएल टेक्नाॅलाॅजी (HCL Technologies) यामध्ये घसरण झाली. ब्रॉडर मार्केटचा चांगला परफॉर्मन्स – Stock Market: ‘या’ कारणामुळे आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 918 अंकांनी वधारला, निफ्टी 24,050 वर बंद मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनी चांगली कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप १.५२% तर निफ्टी स्मॉलकॅप १.६५% वाढीसह बंद झाले. सेक्टोरल पातळीवर ऑटो, बँक आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये चांगली हालचाल दिसली, तर आयटी क्षेत्रावर दबाव कायम राहिला. जागतिक बाजारांचा सकारात्मक कल – आशियातील बहुतेक बाजार तेजीत राहिले. दक्षिण कोरियाचा कोस्पी सुमारे २.१८%, जपानचा निक्केई २२५ सुमारे १.७८% आणि हाँगकाँगचा हँग सेंग १.११% वाढीसह व्यवहार करत होता. अमेरिकन बाजारही गुरुवारी वाढीसह बंद झाले. एस अॅंड पी (S&P 500) ०.६२%, डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल अॅवरेज (Dow Jones Industrial Average) ०.५८% आणि नॅस्डॅक कंपोसझिट (NASDAQ Composite) ०.८३% वाढले. मात्र, अमेरिका-इराण सीजफायरबाबत अनिश्चितता कायम आहे. Stock Market कमोडिटी अपडेट – कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून ब्रेंट क्रुड (Brent Crude) प्रति बॅरल सुमारे ९६.४४ डॉलरवर पोहोचले. पश्चिम आशियातील तणाव आणि सौदी अरेबियाच्या ऊर्जा संरचनेवरील हल्ल्यांमुळे ही वाढ झाली आहे. तर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली. गोल्ड फ्युचर्स सुमारे ०.७१% आणि सिल्व्हर फ्युचर्स १.१२% खाली आले. IPO बाजारात हालचाल – ओम पाॅवर ट्रान्समिशन (Om Power Transmission) चा IPO दुसऱ्या दिवशी खुला असून आतापर्यंत सुमारे ०.४ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. १५०.०६ कोटी रुपयांच्या या इश्यूची मुदत १३ एप्रिलपर्यंत असून १७ एप्रिलला लिस्टिंग अपेक्षित आहे. तसेच प्राॅपर्टी शेअर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (Property Share Investment Trust) चा IPO आजपासून खुला झाला आहे. २४४.६५ कोटी रुपयांचा हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असून १६ एप्रिलपर्यंत खुला राहील. त्याची लिस्टिंग २४ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. वाढीची तीन कारणे – १) बँकिंग व वित्तीय शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे क्षेत्र १.६% वाढले; आठवड्यात ८.२% उसळी, पीएसयू व खासगी बँक निर्देशांक मजबूत. २) आशियाई बाजार तेजीत; S&P 500 ६,८०० वर बंद. Amazon, Intel, Alphabet मध्ये तेजी. ३) रुपया १० पैशांनी मजबूत होऊन ९२.४१ वर; अमेरिका-इराण चर्चेवर नजर, कच्च्या तेलाच्या किमतींवरून पुढील बाजार दिशा ठरणार.