“इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स” स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती रेसिंग टीम ची उत्कृष्ट कामगिरी…

पुणे – इंडियन नॅशनल हिल क्लाइंब चॅम्पियनशिपच्या पुणे क्वालिफायर्स फेरीत दणदणीत विजय मिळवत वर्चस्व गाजवल्यानंतर, त्रिमूर्ती रेसिंग टीमने नुकत्याच पार पडलेल्या लोकेश गौडा इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स (INAC) स्पर्धेतही वर्चस्व गाजवत आपली ताकद दाखवून दिली.
स्पर्धेत पूर्णपणे वर्चस्व गाजवत, त्रीमूर्ती रेसिंग टीमने १७/०१/२०२५ (शनिवार) रोजी १४ पोडियम आणि १८/०१/२०२५ (रविवार) रोजी १३ पोडियम अशी एकूण २७ पोडियम्स मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
त्रिमूर्ती संघाकडून ही यशस्वी कामगिरी करणारे चालक पुढीलप्रमाणे –
संजय लाल, वरुण लाल, मझद्यार वाच्छा, अंकुर मिरकळे, रवींद्र सिंग असी, श्वेत पवार, पिंकेश ठक्कर व प्राची गायकवाड.
या भव्य यशाबद्दल संपूर्ण संघ व सर्व चालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. सातत्यपूर्ण कामगिरी, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर पुण्याची त्रिमूर्ती रेसिंग टीम भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये आपली भक्कम छाप पाडत आहे.





