Indonesia Open 2024 : लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात..

Indonesia Open 2024 : भारताच्या लक्ष्य सेनला (Lakshya sen) शुक्रवारी इंडोनेशिया ओपन 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनकडून (Anders Antonsen) पराभव पत्करावा लागला. या पराभवासह स्पर्धेतील भारताचेही अभियान संपुष्टात आले.
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 14व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनचा जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या अँडर अँटोन्सेनने सरळ गेममध्ये 24-22, 21-18 असा पराभव केला. एक तास आणि एक मिनिट चाललेल्या या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूने डॅनिश खेळाडूला कडवी टक्कर दिली, मात्र तो विजयापासून वंचित राहिला.
Close, so close 💔
Well played Lakshya, end of 🇮🇳 campaign.
📸: @badmintonphoto#IndonesiaOpen2024#Badminton pic.twitter.com/4T6IaVp4Op
— BAI Media (@BAI_Media) June 7, 2024
लक्ष्य सेनचा अँडर्स अँटोन्सेनविरुद्ध सहा सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. उपांत्य फेरीत अँडर्सचा सामना आठव्या मानांकित कुनलावत वितिडसर्नशी होईल. त्याने उपांत्यपूर्व फेरीत ली झी जियाचा 20-22, 21-9, 21-16 असा पराभव केला.
French Open 2024 : गॉफचा पराभव करत ‘इगा स्विटेक’ची अंतिम फेरीत धडक…
दरम्यान, अन्य भारतीयामध्ये महिला दुहेरीत त्रिशा जॉली-गायत्री गोपीचंद आणि तनिषा क्रास्टो-अश्विनी पोनप्पा या जोडीला गुरुवारी पराभव पत्करावा लागला. तर भारताचे अव्वल खेळाडू पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय पहिल्या फेरीत पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर झाले होते. भारतीय शटलर्स आता ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये अॅक्शनमध्ये दिसणार आहेत.





